भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे विभागातील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटर अर्थात झेडआरटीसी येथे लॉक बुकवर सही करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाचेची मागणी स्वीकारताना प्राचार्य सुरेशचंद्र जैन आणि क्लर्क योगेश देशमुख या दोघांना पुण्याच्या सीबीआय पथकाने बुधवारी ६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ताब्यात घेतले या घटनेमुळे रेल्वे भागात खळबळ उडाली आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटर जेटीसी येथे ठेकेदारी पद्धतीने अक्षय चौधरी यांनी चारचाकी वाहन भाडतत्त्वावर दिले होते. त्यांच्या चारचाकी वाहनाचा टेंडर संपला होता. त्या संदर्भात लॉकबुक व सही करण्यासाठी अकाउंटंट योगेश देशमुख यांच्याकडे गेले असता त्या मोबदल्यात देशमुख यांनी या ९ हजार रुपयांची मागणी केली. सदरील रक्कम योगेश देशमुख यांनी स्वीकारून ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटरचे प्राचार्य सुरेशचंद्र जैन यांना देताना पुण्याच्या सीबीआय पथकाने रंगेहात पकडले आहे ही घटना बुधवारी ६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे भुसावळ रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.
स्वीकारलेल्या रकमेवर सीबीआय पथक पुणे येथील अधिकारी महेश चव्हाण यांना दोघांचे ठसे उमटलेल्या मिळाले. सदरील पथक योगेश देशमुख यांच्या बंगल्यावर तसेच प्राचार्य सुरेशचंद्र जैन यांच्या कार्यालयामध्ये सीबीआय पथकाचे अधिकारी महेश चव्हाण यांच्या आदेशावरून १७ ते १८ कर्मचाऱ्यांचे पथक कसून चौकशी करत आहेत