धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) चोपडा तालुक्यातील देवझीरी वनक्षेञातील येनाऱ्या सातपुड्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष तोड सुरु आहे. विशेष म्हणजे याकडे सर्वांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे भविष्यात सातपुड्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती निर्माण झालीय.
या संदर्भात सविस्तर वृत असे की, वनआधिकाऱ्यांचे जंगल तस्करांशी मिलीभगत असल्यामुळे सातपुड्याच्या कुशीत असलेल्या देवझीरी 153 गट क्रमधून अनेक जण बाहेरुन येऊन अनमोल अशा वृक्षाची कत्तल करत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व नियोजन बंधरित्या सुरु आहे. एकीकडे शासन करोडो रुपये खर्च करुन वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेत आहे. तर दुसरीकडे मात्र, सातपुड्यात वृक्षांची सर्रास कत्तल सुरु आहे. त्यामुळे सातपुड्यातील वनपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे वन्यप्रेमी बांधव मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत.