ब्रेकींग : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीसोबत निघालेल्या दुचाकीस्वार बापाला भरधाव ट्रकने रामदेववाडी गावाजवळ चिरडल्याची दुदैवी घटना शनिवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजू दीपक कोळी (वय-४५) रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबासह वास्तव्याला होते. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी हे शनिवारी ३१ डिसेंबर रोजी दुचाकीने जळगावहून निघाले. दुपारी साडे बारावाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली मोठी मुलगी सोनी कोळी ही गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. नंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रूग्णालयात पाठविले. तर जखमीस तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मनहेलवणारा आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content