ब्रेकिंग : भरधाव दुचाकी गाढवावर आदळल्याने दुचाकीस्वार जागीच ठार !

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावलकडून भुसावळकडे जाण्यासाठी निघालेल्या तरुणाच्या भरधाव दुचाकीसमोर अचानक गाढव आल्याने अपघात झाला आहे. या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ जून रोजी फैजपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मनोज चुडामन पिंपळे वय-४५, रा. भालोद ता. यावल ह.मु. गणेश कॉलनी, भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मनोज पिंपळे हा तरूण १७ जून रोजी रात्री ९.३० वाजता यावलकडून भुसावळला जाण्यासाठी जात असताना अकलूज गावाजवळ असलेल्या रस्त्यावर अचानक गाढाव समोर आले. त्यामुळे त्याची दुचाळी गाढवावर आदळली. या अपघातात मनोजचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता. या घटनेबाबत फैजपूर पोलिसात नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास कॉन्स्टेबल मोती पवार करीत आहे.

Protected Content