बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी आज सोमवारी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मात्र येथील कोरडेवाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावाला पाझर तलाव देण्यासाठी ग्रामस्थांनी ही भूमिका घेतली आहे. सकाळपासून ४ तास झाले तरीही गावातील एकाही नागरिकांने आपला मताधिकार बजावला नाही.
कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांना मतदान करण्याची विनंती केली. परंतू आतापर्यंत त्यांनी आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नव्हता. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा सोबत होत आहे.
गावाला पाझर तलाव देण्यासाठी बीडमधील कोरडेवाडी गावाचा मतदानावर बहिष्कार
11 months ago
No Comments