यावल महाविद्यालयात पुस्तक प्रकाशन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थी विकास विभाग उपक्रमांतर्गत “दखल यावल तालुक्यातील सेनानी व त्यागीचीं ” या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील एल.एन. सरदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सोनवणे व महेंद्र पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले. प्रारंभी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी पुस्तक निर्मिती मागील भूमिका विशद केली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते  पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रसंगी  विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.संजय सोनवणे यांनी प्रतिपादन केले की, महाविद्यालयाने निश्चितच कोरोना काळातील वेळेचा सदुपयोग करून दखलपात्र ग्रंथाची उत्कृष्ट निर्मिती केली आहे. तसेच या पुस्तकाद्वारे तालुक्यातील सेनानी व त्यागींच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी पुस्तकाविषयी आपले विचार व्यक्त केले. ग्रंथ निर्मितीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे अर्थसाह्य प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.पी. कापडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तक संपादनासाठी उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार, प्रा.संजय पाटील, डॉ. अनिल पाटील, प्रा. सी .के. पाटील ,डॉ.आर. डी. पवार, प्रा.एस.आर.गायकवाड डॉ. एच.जी. भंगाळे,  डॉ.पी. व्ही पावरा संतोष ठाकूर व मिलिंद बोरघडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Protected Content