Home मनोरंजन पाकी कलावंतांना बॉलिवुडचे दरवाजे बंद

पाकी कलावंतांना बॉलिवुडचे दरवाजे बंद

0
44

मुंबई प्रतिनिधी । पुलवामा येथील हल्ल्यानंतर आता चित्रपटसृष्टी पाकी कलावंतांच्या विरूध्द एकवटल्याचे दिसून येत असून त्यांना बॉलिवुडचे दरवाजे बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील शूटिंग बंद ठेवण्यात आलं होतं. दुपारी येथे पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित म्हणाले की, यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केलं जाणार नाही. पाकिस्तानमधील अनेक कलावंत बॉलिवुडच्या माध्यमातून प्रसिध्द झाले असून त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound