पुणे -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड आणि बारामतीतील मतदानात पैशांचा गैरवापर आणि काही व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यामळे राजकीय खळबळ उडाली होती. आता शरद पवारांनी याला दुजोरा दिला असून बीड आणि बारामतीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे.
शरद पवार यांनी सांगितले की, बीड, पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकी ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. महाराष्ट्रात कधीच पैशाचा वापर झाला नव्हता. यावर्षी मोठया प्रमाणात पैशांचा वापर झाला. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री दोन वाजता एक बँक उघडी होती. आणि तिथून पैसे वाटप होत होते. हा प्रकार घडला आहे. असे कधी झालं नाही पण यावर्षी काही ठिकाणी अशा गोष्टी पाहिल्या मिळाल्या. बीड आणि बारामती मध्ये बोगस मतदान झालं आहे. बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचा प्रकार झाला. बोगस मतदान करणे, लोकांना मतदान करू न देणे हे देखील प्रकार घडले. पुणे जिल्ह्यात देखील असे प्रकार पाहायला मिळेल. यामागे जो आहे त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे हा माझा आग्रह आहे.
पुढे शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोग सध्या असे काही निर्णय घेत आहेत की त्यामुळे अडचण होत आहे. आमचा पक्ष काढून घेतला आमचे चिन्ह काढून घेतला आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागेल. मात्र आम्ही यंदाच्या निवडणुकीत आम्ही सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही स्वतः ४८ पैकी दहा जागा लढवत आहोत आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला फायदा होताना पाहायला मिळतोय.