गिरणा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव  तालुक्यातील नागझिरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली. याप्रकरणी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नागझिरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात एका बाजूला अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आले. या संदर्भात धानोरा गावाचे उपसरपंच अनिल भील यांनी जळगाव तालुका पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे  आणि अनिल मोरे यांच्यासह इतर कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान नातेवाईकांनी मयताची ओळख पटवावी असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

Protected Content