बोदवड प्रतिनिधी | येथील बडगुजर ट्रेडर्स या बिल्डींग मटेरियलच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल सहा लाख रूपयांची रोकड लंपास केली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील भुसावळ रोडवर प्रमोद सुरेश बडगुजर यांच्या मालकीचे बडगुजर बिल्डिंग मटेरियल सप्लायचे दुकान आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आत दुकानात प्रवेश केला. यानंतर काउंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ६ लाख रुपयांची रोकड घेऊन पलायन केले. हा प्रकार सोमवारी लक्षात आला.
या संदर्भात प्रमोद बडगुजर यांनी फिर्याद दिली. तपास उपनिरीक्षक एस.एस.माळी करत आहे. जळगाव येथून आलेल्या ठसे तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.