बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील येवती येथील रहिवासी पुरुषोत्तम देवराम पाटील उर्फ बाळू पाटील यांच्यावर चाकूहल्ला करणार्या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
येवती येथील माजी सरपंच व काँग्रेसचे माजी बोदवड तालुकाध्यक्ष माजी सरपंच पुरुषोत्तम देवराम पाटील उर्फ बाळू पाटील हे सोमवारी सायंकाळी येवती-जामठी रस्त्यावरील साईबाबा मंदिरात आरतीसाठी गेले होते. आरती संपल्यानंतर त्यांच्यावर दोघांनी चाकू हल्ला करत पळ काढला होता. यात चाकू हल्ला करणारा गजानन मुंडे असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली होती. यानुसार गजानन मुंडे (रा.शेगाव, जि.बुलडाणा) व त्याला दुचाकीवर घेऊन पलायन करणारा सचिन लांडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दोन्ही संशयितांना बोदवड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१०) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील गजानन मुंडे हा जखमी पुरुषोत्तम देवराम पाटील उर्फ बाळू पाटील यांचे चुलत भाऊ रमेश पाटील यांचा जावई आहे. संशयिताचे पत्नीसोबत भांडण झाले होते. त्या प्रकरणात पुरूषोत्तम पाटील यांनी मध्यस्थी केली होती. त्याच रागातून संशयिताने चाकूहल्ला केल्याचे तपासात आढळून आले आहे.
jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |