Home धर्म-समाज ७५ फूट लांबीच्या राष्ट्रध्वज रॅलीने वेधले गावकर्‍यांचे लक्ष !

७५ फूट लांबीच्या राष्ट्रध्वज रॅलीने वेधले गावकर्‍यांचे लक्ष !

0
136

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वराड येथे आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

बोदवड तालुक्यातील वराड येथील समाजसेवक अजय पाटील यांच्या संकल्पनेतून आजादीच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी वराड गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गावकरी यांच्याकडून ७५ फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन संपूर्ण गावातील काढण्यात आली. रॅली संपल्यानंतर ग्रामपंचायत वराड व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.

या फेरीला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराड येथे शाळेतील बालकलाकार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य व गायन करून गावकर्‍यांची मने जिंकली. यावेळी गावातील सरपंच अश्विनीताई गोपाल गोराडे, माजी सरपंच शांताराम मोझे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग तथा मुख्याध्यापक इंगळे गावातील संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य व गावकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound