बोदवड Bodvad-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुर्हा-हरदो येथील ८०० वर्ष प्राचिन पायविहीरीवर ( बारव ) महाशिवरात्री निमित्त दिप प्रज्वलित करुन दिपोत्सव साजरा करण्यात आला.
बोदवड तालुक्यातील कुर्हा-हरदो येथे प्राचीन पायविहीर अर्थात बारव आहे. गत महिन्यात या बारवेची साफसफाई करण्यात आल्यावर तरुण मंडळींकडून सहा फुट गाळ काढण्यात आला होता. यानंतर , महाशिवरात्री निमित्त संपूर्ण बारवेवर दिप प्रज्वलित करुन दिपोत्सव साजरा करण्यात आला. कचर्याच्या विळख्यात अडकलेली पायविहीर ( बारव ) आता पुनरुज्जीवित झालेली आहे.
ऊत्तर महाराष्ट्रात तिन प्रवेशिका असलेली जया या नावाने ओळखली जाणारी बारव दुर्मिळ आहे. जामनेर तालुक्यातील तोंडापुर नंतर कुर्हा-हरदो येथे अशा बारव निदर्शनात आलेल्या आहेत. ८०० वर्ष प्राचिन इतीहासाची साक्ष देत असलेल्या वास्तूचे संवर्धन एक्सप्लोर टिम खान्देश या गृपच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण मंडळींकडून होत आहे. कुर्हा हरदो व परिसरातील गावांना ज्ञात असलेली बारव आता जनजागृतीच्या माध्यमातून तालुक्यासहित जिल्ह्याला माहित पडलेली आहे.
या बारवेत यंत्राची शिवलिंग व भगवान विष्णू यांची प्राचिन मुर्ती आहे. व बारवेसमोर हनुमान मंदिर असून मुर्ती समोर नंदी व शेजारी मकरध्वजाची मुर्ती आहे. महादेवाच्या ११ रुद्र अवतारांपैकी रुद्र म्हणजेच हनुमंताच्या अवताराला श्रेष्ठ मानल्या जात असल्याने जिल्ह्यात हे एकमेव व देशभरात दुर्मिळ मंदिर आहे. हाच परिसर महाशिवरात्रीला उजळून निघाला.
दरम्यान, दिपोत्सव साजरा करतांना निना नायसे , प्रमोद माळी , राजू पाटिल , गजानन माळी , आत्माराम सोनवणे , ज्ञानेश्वर बावस्कर, गोलू नायसे , चंदन माळी , वैभव पाटिल , चंदन नायसे , विकास भगत , प्रशांत बेटोदे , गणेश भगत , विनय बावस्कर, सुरेश पाटिल , अमोल माळी , प्रकाश सोनार, विकास शेळके ,भरत पाटिल , गौरव बोरसे , विनायक पाटिल ,अतुल फरपट, शेषराव पाटिल , सुरेश कोळी , सचिन माहोरे, विजय सोनार , प्रदीप टापरे, रामा पाटिल , श्रीराम माळी , सोनु वाढे , आत्माराम पाटिल , गजानन कोल्हे, प्रदीप माळी व टिम एक्सप्लोर खान्देश टीमच्या सदस्यांनी परिश्रम केले.