जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वेस्थानक परिसरात अंदाजे ४० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ लोहमार्ग पोलीसांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकातील रेल्वे मजदूर युनियनच्या कार्यालयासमोर मंगळवारी १० मे रोजी दुपारी एका अनोळखी अंदाजे ४० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. कोणत्यातरी दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज केला जात आहे. दरम्यान लोहमार्ग पोलीसांना माहिती मिळताच धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मयताच्या हातावर दशरथ गशाके असे नाव गोंदलेले आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. अंगावर आकाशी रंगाचा बनियान व हिरव्या रंगाची पॅन्ट आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ लोहमार्ग पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र ठाकूर करीत आहे.