Home Cities जळगाव बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
211

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावा आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने बुधवारी पाच मार्च रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोधगया येथे बौद्ध भिक्षुकांनी सुरू केलेल्या उपोषणास भारतीय बौद्ध महासभाने पाठिंबा दर्शवला असून, बुद्ध विहारावर बौद्ध भिक्षुकांना प्रशासनाची जबाबदारी सोपवावी, अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सरकारने मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

बोधगया महाबोधी विहार हे बौद्ध धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने त्याचे प्रशासन पूर्णतः बौद्ध समाजाच्या ताब्यात असावे, अशी बौद्ध समाजाची मागणी आहे. याप्रसंगी संघटनेचे राज्य सचिव केवाय सुरवाडे सरचिटणीस सुशील कुमार हिवाळे उपाध्यक्ष वसंत लोखंडे जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार संघटक प्रमुख संतोष गायकवाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound