एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तहसील कार्यालयामध्ये कार्यरत मंडळाधिकारी संजय लक्ष्मण साळुंखे यांचा स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवून उत्कृष्ठ मंडळाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय लक्ष्मण साळुंखे यांची एकूण ३३ वर्षे सेवा दिली असून एरंडोल तहसील कार्यालयामध्ये मागील तीन वर्षापासून मंडळ अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. पाचोरा तालुक्यात तलाठी म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा दिलेली आहे. आपल्या कामाचे सातत्य व शासनाच्या विविध उपक्रमांचा सातत्याने पाठपुरावा इत्यादी बाबतीत त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यकुशलते बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत. जळगाव जिल्हा बौद्ध कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद इत्यादी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.