नशिराबाद येथे मानियार बिरदारीतर्फे रक्तदान शिबीर उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा मानियार बिरदारीच्या वतीने आज सकाळी फिजिशियन तज्ञ डॉक्टर मंधार पंडित यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबीरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष गफ्फार मलिक होते तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य पर्वेक्षिका खैरून उन्निसा शेख, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, विनोद रंधे, चंदू पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष अझर खान, उपाध्यक्ष नशिराबादचे बरकत अली, भुसावळचे सरचिटणीस इम्तियाज शेख, नशिराबादचे अय्युब मेंबर, रियाझ मानियार,इस्माईल मानियार व मोहम्मद रईस सैयद यांची उपस्थिती होती.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. नितीन भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.निखील मेहता, मेडिकल ऑफिसर सईद शेख, रितेश वारके,  राज तवर, जनसंपर्क प्रमुख लक्ष्मण पाटील, नर्स शीतल बावणे व ऐश्वर्या थुल यांनी रक्त संकलित केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगावचे ताहेर शेख, मोहसीन शेख, समीर शेख, नशिराबादचे रईस सैयद, मोहम्मद रईस, सलमान शेख, फझल कासार, अहमद शेख सत्तार, शेख फायझ, अझरुद्दीन पिंजारी, सय्यद जहीर, रियाज सय्यद, इस्माईल सय्यद, शेख ताहेर, शेख अन्वर, शेख समीर, शेख अन्सार व सद्दाम शाह  यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content