पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील कुटीर रुग्णालय येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज व महाराष्ट्र शासन आयोजित रक्तदान शिबिरचे आज रविवार १३ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात विविध तालुक्यातील ५१ भाविकांनी रक्तदान केले. यात पारोळा तालुक्यातील ३२ , एरंडोल तालुक्यातून १५ व आमळनेर विभागातील ४ भाविकांनी असे एकूण ५१ भाविकांनी रक्तदान केले. डॉ. बाळासाहेब गव्हाणे जळगाव रेड प्लस ब्लड बँक आणि त्यांचे सहकारी व रक्तदानासाठीप्रमुख अतिथी डॉ. हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, पंचायत समिती सदस्य डी. एम. पाटील, स्वामी शिक्षण संस्था पारोळा अध्यक्ष प्रमुख पाहुणे क. बी. रणधीर, निरीक्षक कुलकर्णी, माजी अध्यक्ष मनोज सोनवणे, शिबीर प्रमुख बहादरपुर भगवान चौधरी, एरंडोल प्रमुख धनराज काबरा, अमळनेर प्रमुख सुधाकर पाटील, पारोळा प्रमुख धनराज खैरनार उपस्थित होते. याश्वितेसाठी विशेष सहकार्य महिला प्रमुख आशा पाटील, सहकार्य
माधुरी भालेराव, श्रावण गोसावी, अतुल परदेशी, राजेंद्र शिंपी, अतुल शिंपी, ईशांत भालेराव, महेश साळी, किरण कासार व गावातील नागरिक उपस्थित होते.