अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पातोंडा येथे भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष महेंद्र पाटील व माजी सरपंच शितल पाटील यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार स्मिता वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बी.एस पाटील, भाजपा युवा प्रदेश सरचिटणीस भैरवी पलांडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, मा.जि.प सदस्य व्ही.आर.पाटील, मा.सभापती श्याम बापू अहिरे, मा.जि.प.सदस्य विनायक बिरारी, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, जिजाब नाना, संदीप पाटील, दिलीप पाटील, उपसरपंच नितीन पारधी, किशोर पाटील, घनश्याम पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण बिरारी यांनी केले.