जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरांमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले मोठ्या रक्तदात्यांनी रक्तदान केले. ५० रक्त बाटल्याचे संकलन झाले असून त्याच बरोबर उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आले.
जामनेर तालुक्यात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले असून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी नेते बंगालीशिह चीतोडीया, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, तालुकाध्यक्ष नाना पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ, अरविंद तायडे, प्रभू झाल्टे, दत्ता नेरकर, किरण पाटील, पराग नेरकर, विलास पाटील, प्रशांत चौधरी, हिरामण जोशी, किशोर शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.