सरकारी कार्यालयांना सात दिवस सुटी नाही ; मुख्यमंत्र्यांकडून खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, सरकारी कार्यालय बंद राहणार नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली. राज्यात करोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दुर्दैवाने एका रुग्णाचा मृत्यू आहेत. या रुग्णांमध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. इतर सगळ्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बस किंवा ट्रेन रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. गर्दी न ओसरल्यास आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील. जनतेने या विषयाचे गांभीर्य लक्षात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतरांनी दुकानं बंद ठेवावीत. जनेतेने स्वतःहून स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, सरकारी कार्यालयात फिफ्टी-फिफ्टी बेसेसवर काही प्रमाणात कामकाज करता येईल का? याबाबात विचार सुरू असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 दिवस सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंद असतील, असा निर्णय घेतल्याच्या सोशल मीडियात आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Protected Content