जळगाव प्रतिनिधी । शहरातील आहुजा नगर येथे वृंदावन रेसीडेंसी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 42 दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व माजी आमदार मनिष जैन यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ हे होते. यावेळी अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, संजय गरुड, जिल्हा प्रवक्ता योगेश देसले, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला प्रदेश सरचिटणीस मंगलाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, रमेश माणिक पाटील, मिनाक्षी चव्हाण, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, दिव्या भोसले, कोमल पाटील, वाल्मिक पाटील, राजेश पाटील, अॅड. कुणाल पवार,
अनिल पाटील, डॉ.रिझवान खाटीक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, मोहन पाटील, अॅड. राजेश गोयर, मनोज खरारे, अशोक पाटील, अशोक सोनवणे, नितीन तावडे, रणजित पाटील, विकास पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी उपस्थित होते. यावेळी जेष्ठांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.एस.महाजन सर यांनी केले. तर यशस्वीतेसाठी देवेंद्र झापर्डे, रामलाल पाटील, पंकज देसले, नंदकिशोर सुर्वे, विजय पाटील, अतुल पाटील, बाबासाहेब थोरवे, धनंजय झापर्डे, तुषार मोरे, पवन शिरसाळे, उमेश बाविस्कर, किशोर पाटील व वृंदावनचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.