नारायण राणे यांच्या समर्थनार्थ वरणगावात भाजपचा रस्ता रोको (व्हिडिओ)

वरणगाव प्रतिनिधी । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज दुपारी अटक करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे रास्ता रोको करण्यात आला आणि आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द  वक्तव्य केल्यामुळे आज दुपारी नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा निषेध व्यक्त करत वरणगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी नॅशनल हायवे क्रमांक 6 रोखून धरला. काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आघाडी सरकारच्या विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. वरणगाव पोलिसांनी आंदोलन करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/525932811808650

 

Protected Content