जालन्यातील स्टील कंपनीत स्फोट; ३४ मजूर भाजून जखमी

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये भयंकर स्फोट झाला आहे. या स्फोटाचा आवाज दूरवर आला. भीषण स्फोटाने जालना एमआयडीसी हादरली आहे. जालन्यातील औद्योगिक वसाहतीत स्फोटाचा आवाज आला.

मिळालेल्या माहितीनुसार कज केसरी या स्टील कंपनीत दुपारच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर ३४ जण गंभीररीत्या भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी जात कंपनीची पाहणी केली मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली नाही. बॉयलरमध्ये स्फोट कसा झाला, नेमकं काय कारण होतं हे देखील अद्याप कळू शकले नाही. ३४ मजूर गंभीर जखमी असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Protected Content