Home राजकीय प्रज्ञा सिंह ठाकूरवर भाजपची कारवाई ; संरक्षण समितीवरूनही हटवले

प्रज्ञा सिंह ठाकूरवर भाजपची कारवाई ; संरक्षण समितीवरूनही हटवले


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला चक्क लोकसभेतच देशभक्त म्हणणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संसदेच्या संरक्षण समितीवरून हटविण्यात आले आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या संसदीय गटाच्या बैठकीत त्यांना सहभागी केले जाणार नाहीय, अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली आहे.

 

भोपाळ येथून खासदार असलेल्या वादग्रस्त भाजप नेत्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला बुधवारी लोकसभेत देशभक्त म्हटले होते. बुधवारी द्रमुक खासदार ए राजा यांनी गोडसेचे वक्तव्य वाचून दाखवत होते. ज्यामध्ये गोडसेने गांधींची हत्या का केली? हे सांगण्यात आले होते. यावर प्रज्ञा ठाकूरने त्यांना रोखताना सांगितले होते की, आपण एका ‘देशभक्ताचे’ उदाहरण देऊ शकत नाही, यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. याआधीही प्रज्ञा ठाकूरने गोडसेला देशभक्त म्हटले होते.


Protected Content

Play sound