अपघातग्रस्त महिलेसाठी भाजप कार्यकर्त्याची तत्परता; रूग्णालयात केले दाखल

रावेर लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर कार व दुचाकी अपघात जखमी झालेल्या महिलेला भाजपाचे युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे यांनी तात्काळ सहकार्य करून त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. कार्यकर्त्याने दाखवलेली तत्परतेमुळे महिलेला वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे कौतूक केले आहे.

अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात चार युवकांचा बळी गेला असताना, आजही बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर जंगली पिर नजीक रावेरकडून आहीरवाडीला जाणाऱ्या लताबाई राजू पाटील यांच्या दुचाकी मागून एका कारने धडक दिली. या धडकेत लताबाई पाटील मोटरसायकलवरून खाली पडल्या.

यावेळी रावेरकडे येत असलेले भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे यांनी ती महिला पाहून तत्काळ मदतीचा हात दिला. त्यांनी आपल्या खाजगी गाडीतून त्या महिलेला उचलून रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लताबाई पाटील यांच्या परिवाराने संदीप सावळे यांचे देवदूताप्रमाणे मदतीसाठी आभार मानले आहेत. महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून, अशा घटनांमध्ये मदतीसाठी तत्पर असलेल्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद आहे. संदीप सावळे यांची तत्परता आणि माणुसकीचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

Protected Content