धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच्या होणाऱ्या पतीकडून लग्न आधीच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात रविवारी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान जामनेर तालुक्यात राहणारा तिच्या चुलत आत्याचा मुलगा याच्याशी लग्न ठरलेले आहे. मुलगी १८ वर्षाची होईल त्यानंतर त्यांचे लग्न केले जाईल असे ठरलेले होते. त्यामुळे त्यांच्यात फोनवरून बोलणे सुरू होते. ऑगस्ट २०२४ मध्ये पीडित मुलीचा चुलत आत्याचा मुलगा म्हणजेच भावी पती हा तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरी अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह पीडित मुलीने धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीवर रविवारी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.