कोल्हापूर- शिवसेनेशी कटुता नाही, परंतू आम्हाला आमची ताकद वाढवायची असल्याने यापुढे शिवसेनेसोबत कधीही जाणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्हाला आमची ताकद वाढवायची आहे. त्यामुळे शिवसेनाही नको आणि राष्ट्रवादीही नको. यापुढे शिवसेनेसोबत आता जाणार नाही. हे आपले मत आहे. तरीही याबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर केंद्रीय नेतृत्व घेईल. सध्या विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका बजावतोय. यापुढेही बजावू. अंतर्विरोधामुळं सरकार पडणार हे सर्वे केला तरी लोकं सांगतील. सरकार बदलण्याबाबत आम्ही भविष्य करत नाही. मुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही.
मात्र महाराष्ट्रातील प्रश्नांचा अभ्यास त्यांना नाही. शरद पवारांनी अचानक त्यांचे नाव पुढे केल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. उद्धवजींना मंत्रालय माहित नव्हतं. कामकाज कसं चालत हे माहित नाही. ते त्यांनी जाणून घेणे, समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी आपला अभ्यास वाढवायला हवा.