उत्तर महाराष्ट्रातील पराभवाचा भाजप अहवाल बनवणार ; आशिष शेलार यांची माहिती

ashish shelar

नाशिक (वृत्तसंस्था) उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पराभव का झाला?, याचा अहवाल भाजपकडून तयार केला जाणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार व माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या अहवालातून एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या पराभवाचे विश्लेषणही यातून समोर येणार आहे.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जाहीर नाराजीनंतर भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे. खडसेंचे प्रभावक्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील १२ जागांवर भाजपचा पराभव झाला. त्याची नेमकी कारणे काय आहेत?, याचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,’ असे शेलार यांनी सांगितले. एकनाथराव खडसे आणि पंकजा मुंडे सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. मुंडे यांनी मी भाजप सोडणार नाही. पण पक्षाने काय तो निर्णय माझ्याबाबतीत घ्यावा. तर दुसरीकडे मी भाजपमध्ये राहीन की नाही याचा भरोसा नाही, असा इशाराच खडसे यांनी दिला आहे. भाजपमधील नाराज ओबीसी नेत्यांची मोटही त्यांनी बांधली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील पराभवाचा विश्लेषणात्मक अहवाल तयार केला जात आहे.

Protected Content