रांची वृत्तसंस्था । झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली असून यात पोस्टल मतदानात भाजपला धक्का बसला असून जेएमएम-काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.
झारखंडमधील ८१ जागांसाठी नुकतेच चार टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. यात भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली असून एनडीएचा घटकपक्ष असणारे जेडीयू आणि एलजेपीने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलदेखील रिंगणात आहेत. या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. यात पोस्टल मतदान पहिल्यांदा मोजण्यात आले. यात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व आरजेडीच्या आघाडीला लाभ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थात, पहिल्या फेरीमध्ये भाजला जोरदार धक्का बसला असून हाच कल पुढे कायम राहिल्यास झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाची आघाडी सत्तारूढ होण्याची शक्यता आहे.