भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून भडगावात त्यांचे आगमन झाले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्ष ऍक्शन मोडवर आला असून या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्यावर आले आहेत. त्यांच्या सोबत पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे देखील आहेत. या दौर्यात ते जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स सोबत ते संवाद साधणार आहेत. तसेच घर चलो अभियानाच्या अंतर्गत आयोजीत कार्यक्रमांमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत. भडगावात लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दिनांक २९ रोजी सकाळी ते भडगाव येथील कार्यक्रमांना हजेरी लाऊन नंतर पक्षाचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. तर दुपारून सुपर वॉरियर्सच्या बैठकीसह घर चलो मोहिमेत ते सहभागी होतील.