मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. तासाभराच्या खलबतांनंतर सत्तास्थापनेचे सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावे, अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात आता सत्ता स्थापनेला आता वेग आला आहे. सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका काय असावी यासंदर्भातील एका बैठकीचे आयोदन आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. तासभर चाललेल्या या बैठकीत सत्तेचे समसमान वाटप करण्यात यावे. तसेच सत्तास्थापनेचे सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावे, अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. तर सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असेही बैठकीत ठरवण्यात आल्याचे कळते.