मार्च महिन्यात महाराष्ट्रात 55,000 पेक्षा जास्त मुलांना कोरोना संसर्ग : खासदार मनोज कोटक

 

मुंबई : वृत्तसंस्था । “महाराष्ट्रात कोरोना  दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये लहान आणि तरुण मुलांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. म्हणून राज्य सरकारने वेगळी मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, अशी मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली.

 

मार्च माहिन्यात राज्यात जवळ जवळ 55,000 पेक्षा जास्त कोरोना बाधित मुले आढळून आले आहेत. यात 0 ते 10 वर्षे वयोगटातील 15,500 मुले आणि 11 ते 20 वर्षे वयोगटातील 40,000 तरुण मुलांचा समावेश  आहे

 

मनोज कोटक म्हणाले, “वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यामध्ये राज्यातील 6 लाखापेक्षा जास्त बाधितांमध्ये मुले आणि तरुणांचे प्रमाण जवळपास 55,000 पेक्षा जास्त आहे. मार्च मध्ये एकंदर बाधितांमध्ये 21 ते 30 ते वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 17 टक्के, 31 ते 40 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 22 टक्के तर 41 ते 50 वयोगट 18 टक्के होते.”

 

 

 

“या वर्षी 0-10 वयोगटात जानेवारीमध्ये 2000, फेब्रुवारीमध्ये 2700 आणि मार्चमध्ये 15,500 अशी रुग्ण संख्येत वाढ होत गेली. 10-20 वयोगटात हे प्रमाण जानेवारीत 5300, फेब्रुवारीत 8000 आणि मार्चमध्ये 40,000 असे होते. गेल्या वर्षी 0-10 वयोगटातील 87,000 तर 10-20 गटातील 1.82 लाख मुलांना कोरोनाचा फटका बसला. बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात मुलांचा समावेश असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मृतांच्या संख्येत मुलांचे प्रमाण जास्त नाही,” अशीही माहिती देण्यात आली आहे.

Protected Content