कोल्हापूरात भाजपला धक्का; मोठे नेते हातात तुतारी घेण्याच्या तयारीत

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कागल विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भूमिका बदलण्याची गरज आहे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्यानंतर भाजपचे मोठे नेते समरजितसिंह घाटगे शुक्रवारी यांनी कागल तालुक्यात स्वराज्य आणण्यासाठी राजकीय दिशा बदलण्याचे संकेत दिले. ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांना सांगून ही भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याची घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

भाजपत असलेले घाटगे यांची अडचण झाली होती. त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली होती. तथापि याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे घाटगे यांनी पवार यांना सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी आज शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेऊन नवे राजकारण करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. २०१९ ची विधानसभा निवडणूक आईसाहेबांनी सांगितल्यामुळे लढली होती. आताही त्यांनी तुतारी हाती घेण्यास सांगितलेले आहे. कागल विधानसभा मतदारसंघात स्वराज्य स्थापन करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली, तरी त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content