मुंबई प्रतिनिधी । युती होणार की नाही हा संशयकल्लोळ काल रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत मिटल्याची माहिती असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.
गुरूवारी रात्री उशीरापर्यंत भाजप आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असणार्या वक्तव्यांमुळे युती होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. विशेष करून शिवसेनेने निम्म्या जागांचा आग्रह कायम धरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यातच नाणावरून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळ चक्रावून गेले होते. तथापि, काल रात्री उशीरापर्यंत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. यात जागावाटपाचे सूत्र ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार भाजप १६२ तर शिवसेना १२६ जागांवर लढविणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह २२ रोजी मुंबईत येत असून त्यांच्याच उपस्थितीत युतीबाबत घोषणा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.