जळगाव शहर पोलीस ठाण्यात भाजपचे निषेध आंदोलन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दूध संघात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याची तक्रार भाजपच्या आमदार मंगेश चव्हाण यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे भाजप महानगरच्या वतीने शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

जळगाव जिल्हा दूध संघात लोणी आणि दूध पावडरमध्ये मोठा अपहार झाल्याची तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांनी मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती. संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी देखील मागणी करण्यात आली होती. परंतु तक्रार देऊन तीन दिवस झाले अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन निपक्षपणे या घटनेची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका सुचिता हाडा, नगरसेविका दीपमाला काळे, राधेश्याम चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी चर्चेंअंत या घटनेत पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, यात जो कुणी दोषी आढळून येईल, त्याच्यावर निश्चितपणे गुन्हे दाखल करण्यात येईल असे आश्वासन व ग्वाही यावेळी दिली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/654728259498642

 

Protected Content