जळगाव (प्रतिनिधी) सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी भाजपातील दोन गटाच्या पदाधिकाऱ्यांंमध्ये आज चांगलीच खडाजंगी झाली.
अजिंठा गेस्ट हाऊसवर काल (रविवारी) गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची सभापतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. परंतू गेली 35 वर्ष कार्यरत असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांना डावलून महाजन गटातील अमित देशमुख यांची नावं उमेदवार म्हणून समोर आले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप झाला होत दोन्ही गटात जिल्हापरिषदेमध्येच बाचाबाची झाली. त्यानंतर रवींद्र पाटील आणि उज्ज्वला प्रशांत पाटील यांनी बंडखोरी करत सभापती आणि उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केले.