विवेकानंद विद्यालयाची प्रतिक्षा पाटील तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत द्वितीय

rangoli compi

चोपडा, प्रतिनिधी | चहार्डी विद्या प्रसारक मंडळ संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडा येथे संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील प्रतीक्षा ज्ञानेश्वर पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

 

विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी स्वरूप रवींद्र दाभाडे, प्रतिक्षा ज्ञानेश्वर पाटील (लहान गट) तर ऋचा दंडवते, मानसी मनोज सोनार (मोठा गट) हे स्पर्धेत सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्षाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळ, पदाधिकारी ,शिक्षकवृंद ,पालकवृंद व विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Protected Content