भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा – भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे ओढा कायम असून नुकताच पाचोरा तालुक्यातील नाईकनगर व आंबे वडगाव येथील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

आ. किशोर पाटील यांच्या “शिवालय” संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे पाचोरा तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड, नाईक नगर येथील भाजपचे माजी सरपंच गोपी चव्हाण व इतर कार्यकर्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना शिवसेनेचा भगवा रुमाल परिधान करत पक्षात स्वागत केले.

आपण भाजपा पक्षात काम करत असतांना आपल्याला योग्य न्याय मिळू शकणार नाही. याची जाणीव झाल्याने व त्यामुळे पक्षात होणारी घुसमट लक्षात घेता आपण शिवसेनेची कास धरली असून आ. किशोर पाटील यांचे नेतृत्वात वंजारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नरत राहणार असल्याची प्रतिक्रिया विजय राठोड यांनी व्यक्त केली. आ. किशोर पाटील यांनी देखील पक्षात त्यांचा योग्य सन्मान राखत त्यांचेवर लवकरच योग्य ती जबाबदारी देणार असल्याचे सूतोवाच दिल्याने वंजारा समाज बांधवात आनंद व्यक्त होत आहे.

यावेळी शेतकरी आघाडीचे अरुण पाटील, डॉ. धनराज पाटील, लोहाराचे उपसरपंच अक्षय जैस्वाल, सुभाष राठोड, श्रीराम राठोड जगन चव्हाण, रामकृष्ण मोची, गुरुदास चव्हाण यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!