भाजपा मंत्र्याचा निवडणूक अधिकाऱ्यासोबत वाद ; हेलिकॉप्टर तपासूच दिले नाही

bjp minister

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यास प्रधान यांनी अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यास आलेल्या पथकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांशी ते वाद घालतानाचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी, प्रधान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे मागितली. तसेच या पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. विशेष म्हणजे, प्रधान यांच्या अशा वागण्यामुळे अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच परत फिरले. सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्याही हेलिकॉप्टरवर भरारी पथकाने धाड टाकली आहे. त्यामध्ये पटनाईक यांनी भरारी पथकाला संपूर्ण सहकार्य करत, हेलिकॉप्टरची तपासणी करू देतांना दिसत आहे. दरम्यान, ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले होते.

Add Comment

Protected Content