यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात होवू घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज यावल कृषी उत्पन्न बाजार येथे गुजरात राज्याचे माजी मंत्री विनोद मोरडिया यांच्या अध्यक्षते खाली शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक पार पडली.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीत गुजरात राज्याचे माजी मंत्री विनोद मोरडीया यांनी मार्गदर्शन करतांना पक्षाच्या महत्वाच्या पदधिकारी यांच्याशी संवाद साधतांना कार्यक्रत्यांनी मतदाना प्रसंगी आपल्या बूथ वरती जाऊन कसे काम करायचे काय काय कामे करावे या संदर्भात बोलतांना मार्गदर्शनपर माहिती दिली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले कि मतदारांना भेटतांना त्यांच्या काय काय समस्या आहे हे जाणून घ्यावे असे कामे सांगितले तसेच काम करतांना आपल्याला काय अडचणी येतात या सर्व वरीष्ठ स्तरावर पोहचाव्यात जेणे करुन हे कामे आपल्याला माध्यमातून पुर्ण करण्याचा प्रयत्न करूया अशा सुचना त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांना दिल्या.
या वेळी सुरेश धनके, प्रदिप पाटील, मसाकाचे माजी चेअरमन व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, भाजपा जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, भाजपाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष व कृउबाचे सभापती राकेश फेगडे, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे जिल्हा जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, भाजपा यावल तालुका सरचिटणीस तथा कृउबाचे संचालक उजैनसिंग राजपुत व तालुका सरचिटणीस विलास चौधरी, गणेश नेहेते, कृउबाचे माजी सभापती नितीन चौधरी व नारायण चौधरी, भाजपा जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष नितीन राणे, हेमराज फेगडे, डॉ नरेंद्र कोल्हे, नितीन चौधरी, भाजपा अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष नागेश्वर सावळे, भाजपा यावल शहर अध्यक्ष राहुल बारी, पिंटू तेली, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू फेगडे ,दिपक चौधरी, पंकज पाटील, श्याम महाजन, भरत चौधरी, अतुल भालेराव ,पी डी चौधरी, पी एस सोनवणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी,युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा सरचिटणीस भुषण फेगडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण नेहते,शरद कोळी, मुकेश कोळी , माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सविता भालेराव , सौ सरला कवडीवाले आदी सर्व पदाधिकारी व मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.