नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार या देखील उपस्थित होत्या.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विवेक कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी बंडखोरी केलेली नाही. मुळात ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे तो शिक्षकांशी निगडित मतदारसंघ असल्याने येथे राजकीय जोडे बाजूला ठेवून या उमेदवारीकडे बघितले पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळे पक्ष मिळून प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा देश घडवणारा महत्त्वाचा घटक आहे, एक निवडणूक प्रक्रिया त्याचा हा भाग आहे. जी ती गोष्ट ज्या त्या वेळी झाली पाहिजे. कामाला लागण्यासाठी मी पहिले उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक लागल्यावर एक-एक मत महत्त्वाचे असते. एक-एक व्यक्ती महत्त्वाचा असतो. ज्यावेळी अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न उद्भवत नाहीअसे त्यांनी म्हटले.