भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष आ.भोळे यांचा भोरगाव लेवा पंचायतर्फे सत्कार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांची भाजपा जळगाव जिल्हा(ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे भोरगाव लेवा पंचायती ( पाडळसे ) तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

एका छोटेखानी कार्यक्रमात करतांना लेवा समाजाचे कुटूंबनायक रमेशदादा विठू पाटील, कुलसचिव ॲड.संजय राणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, ललित रमेश पाटील, भाऊसाहेब फिरके,नगरसेवक सुनील खडके,चंदन महाजन व गिरीश नारखेडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.याप्रसंगी कुटुंबनायकांनी हरीभाऊ जावळे यांच्या अकाली मृत्यूबाबत संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या माध्यमातून समाजातील एक कर्तबगार व सालस नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्या आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content