धरणगावात भाजपला धक्का ; अनेक कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

WhatsApp Image 2020 01 04 at 4.19.33 PM

धरणगाव, प्रतिनिधी | शहरातील हनुमान नगर येथील अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी नामदार गुलाबराव पाटील तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत  प्रवेश केला.

भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी ना. गुलाबराव पाटील व सेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. सेनेत प्रवेश करणाऱ्यामध्ये किशोर महाजन, सुनिल महाजन, शिवाजी पाटील, पवन मराठे, जितेंद्र बयस, तुकाराम महाजन यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत नामदेव मराठी, ज्ञानेश्वर पाटील, गणेश महाजन, भैया पाटील, अशोक ठाकूर, दीपक महाजन ,देवा महाजन यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश महाजन, रामचंद्र महाजन, सोनू चौधरी, राजेंद्र मराठे, परमेश्वर वाहक, संतोष भोई, कांतीलाल महाजन, छोटू मराठी, विजय चौधरी, अन्वर शेख, जगदीश मराठी, ज्ञानेश्वर गुरव या कार्यकर्त्यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थित शिवसेना लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते पप्पू भावे, नगरसेवक अहमद पठाण, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, विभाग प्रमुख संजय, चौधरी,बाळू भाऊ जाधव, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी, जयेश महाजन, विनोद रोकडे, विलास पवार, व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content