मुंबई प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या राजकीय परिस्थितीबाबत भाजपची ‘वेट अँड वॉच’ या प्रकारातील भूमिका असल्याचे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सध्या सुरू असणार्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी रात्री संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, भाजपच्या कोअर समितीची बैठक झाली. यात विद्यमान राजकीय स्थितीबाबत आमची ‘वेट अँड वॉच’ या प्रकारातील भूमिका असल्याचे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.