उद्या पुन्हा बैठकांवर बैठका !

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्ता स्थापनेतील अडसर दुर करण्यासाठी मंगळवारी सर्व राजकीय पक्षांनी पुन्हा महत्वाच्या बैठका बोलावल्या आहेत.

सोमवारी सत्ता स्थापनेचा पेच संपेल असे वाटत होते. तथापि, शिवसेनेला दोन्ही काँग्रेसकडून पाठींब्यांचे पत्र मिळाले नाही. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रीत केले. हे आमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईतल्या शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. रात्री उशीरापर्यंत येथे खलबतं होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच मंगळवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीतर्फे सर्व आमदारांची बैठक उद्या घेण्यात येणार आहे. काँग्रेसतर्फेही याच प्रकारची बैठक घेण्यात येणार आहे. तर दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवास्थानी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. तर भाजप आणि शिवसेनेच्या बैठका होण्याची शक्यता आहे. यामुळे उद्या दुपारनंतर महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Protected Content