नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात म्हणजेच २०१८-१९ या कालावधीत भाजपाला तब्बल ८०० कोटी रूपयांच्या देणगी मिळाल्या आहेत. यात एकट्या टाटा उद्योग समूहाच्या ‘प्रोगरेसिव्ह इलेक्ट्रोल ट्रस्ट’ने भाजपाला तब्बल ३५६ कोटी रूपयांची देणगी मिळाली देण्यात आली आहे.
भाजपाला यावर्षी धनादेश आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिकची देणगी मिळाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी भाजपानं निवडणूक आयोगाला यासंदर्भातील माहिती दिली आहे.तर त्यांच्या तुलनेत काँग्रेसला अवघ्या १४६ कोटी रूपयांची देणग्या मिळाल्या आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे ट्रस्ट ‘द प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट’नं भाजपाला ६७ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. तर याच ट्रस्टने काँग्रेसलाही ३९ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. काँग्रेसला मिळालेल्या १४६ कोटी रूपयांच्या देणगीतून ९८ कोटी रूपयांची देणगी इलेक्टोरल ट्रस्टकडून मिळाले आहेत. तर भाजपाला मिळालेल्या ८०० कोटी रूपयांच्या देणगीपैकी ४७० कोटी रूपये इलेक्टोरल ट्रस्टकडून मिळाले आहेत.