Home Uncategorized भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी घेतली पालवे परिवाराची भेट

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी घेतली पालवे परिवाराची भेट

a0e7d53d 006c 4faa 8731 3abf1c9d7a2512
a0e7d53d 006c 4faa 8731 3abf1c9d7a2512

a0e7d53d 006c 4faa 8731 3abf1c9d7a2512

चाळीसगाव (प्रतिनिधी) भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी जनसंघ तसेच भारतीय जनता पार्टीचे संस्थापक जिल्हा अध्यक्ष स्व. अॅड.शिवाजीराव पालवे यांच्या नेताजी चौक येथील राहत्या घरी नुकतीच भेट दिली.

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील आज पक्षाच्या जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथून जिल्हाध्यक्षपदाचा कारभाराला सुरुवात करणार आहेत. जिल्हाध्यक्षपदाच्या कामकाजाला सुरुवात करण्याआधी डॉ.पाटील यांनी माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजीराव पालवे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपल्या कामकाजाला शुभारंभ केला आहे. याप्रसंगी रागिनी पालवे, यश पालवे, राधाकृष्ण पालवे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे त्यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी शहर सरचिटणीस अॅड. प्रशांत पालवे यांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यात पक्षाचे संघटन, विस्तार जोमाने करत आहोत. तसेच तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील व मान्यवरांसोबत पक्षाची ध्येय धोरणे तळागाळा पर्यंत आम्ही पोहचवत असून आपल्या सूचना मार्गदर्शनाने आम्ही पक्षाचे काम नेटाने पुढे नेऊ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound