Home Cities जळगाव भागपूरसह आदिवासी पाड्यांवर भाजपतर्फे दिवाळी फराळ वाटप!

भागपूरसह आदिवासी पाड्यांवर भाजपतर्फे दिवाळी फराळ वाटप!

0
भागपूरसह आदिवासी पाड्यांवर भाजपतर्फे दिवाळी फराळ वाटप!

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दिवाळीचा आनंद दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नशिराबाद शहर भाजपाच्या वतीने भागपूरसह परिसरातील आदिवासी पाड्यांवर दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. माजी खासदार स्व. वाय. जी. महाजन यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांच्या सहकार्याने यंदा जवळपास ९५ आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पाहायला मिळाला.
यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक मनोज पाटील, प्रदीप बोढरे, सचिन महाजन, धनंजय वाणी, प्रदीप देशपांडे, जितेंद्र महाजन, विनोद रंधे, गुंजन पाटील, नीरज पाटील, धनराज राणे, विकास वाणी, युवराज पाटील, प्रमोद राजपूत यांच्यासह भाजप पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.