चाळीसगाव, प्रतिनिधी | विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रा.स.प. रिपाई यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील गावागावातून नेटाने प्रचार सुरु केला आहे. आता मतदारांमध्ये त्यांची चांगलीच ओळख निर्माण झाली आहे.
प्रचारादरम्यान चव्हाण हे वडीलधाऱ्या मतदारांचे नम्रतेने आशीर्वाद घेत आहेत. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतंत्रपणे मतदार व नातेवाईक मंडळींच्या भेटीगाठी घेऊन मंगेश चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.